Tuesday, September 17, 2024

बीडमध्ये हिंदू समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Share

महिलांवर होणारे अत्याचार, हिंदू साधू संतांवर होणारे हल्ले, बांगलादेश मधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवण्याच्या मागणी करण्यासाठी बीडमध्ये आज (३१.०८.२०२४) मूक मोर्चा काढण्यात आला होता.

सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हिंदू साधू- संतांवर होणारे हल्ले, बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार तसेच मंदिरावर होणारे हल्ले याबरोबरच गोहत्या बंदी कायदा अंमलबजावणी बाबत ठोस कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. शहरातील सारडा कॅपिटलपासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यावर धडकला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले यावेळी भारत अमदापुरकर यांनी उपस्थित हिंदू बांधवांना मार्गदर्शन केले.

अन्य लेख

संबंधित लेख