Thursday, November 21, 2024

‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ – आशिष दुसाने

Share

पुणे – भारतीय संस्कृतीला प्राचिन इतिहास आहे. हिंदू हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. संविधानाने आपल्याला अधिकारासोबत जबाबदारीसुद्धा दिली आहे आपण त्याची जाणीव ठेऊन मतदान करायला हवे असे मत आशिष दुसाने यांनी व्यक्त केले.

धनकवडी येथील फ्लाईंग बर्डस स्कूलने ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर विद्यार्थी, पालक आणि  सेवकवृंद यांच्यासाठी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी वक्ते आशिष दुसाने यांनी  ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विषयावर परखड विचार मांडले.

भारतामध्ये हिंदुत्ववादी संस्कार प्राचिन काळापासून कसे रुजले आहेत व ते टिकवणे याची सध्या किती आवश्यकता आहे याचा सखोल आढावा त्यांनी घेतला. हिंदुत्वाची कास धरून सर्वधर्म समभावाची भावना मनावर कोरली जाणे  काळाची गरज असून विद्यार्थीदशेत याची जाणीव  व्हायला पाहिजे. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्यादेवी होळकर यांनी  हिंदू धर्मरक्षणाकरिता केलेल्या कार्याची आठवण करून दिली. हिंदुत्वासाठी व राष्ट्रीयत्वासाठी समाजाने एकत्र येऊन मतदानाचे पवित्र कार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुजाता पारेख आणि कविता गोडबोले उपस्थित होत्या. अपर्णा मोडक यांनी प्रास्ताविक केले.

अन्य लेख

संबंधित लेख