Friday, January 9, 2026

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब

Share

मॉस्को असो व म्युनिक, सिडनी असो वा पहलगाम, मरणारा हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी कोणीही असू शकतो. पण मारणारा कायम मुस्लिमच का? 

ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान केलेल्या बेछूट गोळीबारात १५ ज्युईश नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० ते ८७ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. यातील २५ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ५० वर्षीय साजिद आणि त्याचा २७ वर्षीय मुलगा नवीद यांनी हा गोळीबार केला असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या गोळीबारात साजिद ठार झाला, तर जखमी नवीदवर उपचार सुरू आहेत. नवीन माहितीनुसार, नवीदवर दहशतवाद आणि १५ खुनांच्या आरोपांसह ५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, आणि प्राथमिक पुराव्यांनुसार हा आयएसआयच्या प्रेरणेने घडवून आणलेला दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत संपुर्ण युरोपमध्ये अनेक मुस्लिम देशांमधून आलेल्या निर्वासितांमुळे गुन्हेगारी, व्यसने, सामाजिक धार्मिक असंतोष, गटबाजी, अनैतिकतेचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येऊ लागले आहे. स्थानिक समाजांची सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात आली आहे. त्यांना आपले सणही सुरक्षित वातावरणात साजरे करता येईनासे झाले आहेत. हजारो ब्रिटिश मुली ग्रूमिंग गँगच्या कारस्थानांना बळी पडल्या आहेत. 

बॉन्डी बीचवरील रक्तपात आणि मुंबईचे वास्तव: बांगलादेशी व रोहिंग्यांच्या अवैध घुसखोरीमुळे मुंबईकर चिंतेत

जरी हा दहशतवादी हल्ला ऑस्ट्रेलियात झाला असला तरी, त्यामुळे आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षेतील त्रुटींबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. – विशेषतः भूतकाळात अनेकदा दहशतवादी हल्ल्यांचे लक्ष्य ठरलेल्या मुंबईच्या सुरक्षिततेच्या चिंता वाढल्या आहेत. २००८ च्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी शहरावर हल्ला केला होता. यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांमुळे मुंबईची सुरक्षा यंत्रणा नेहमीच सतर्क राहते, पण अवैध घुसखोरीमुळे नवीन धोके निर्माण होत आहेत. ठाकरे सरकार आल्यापासून म्हणजे गेल्या अर्धदशकात अचानक वाढलेल्या बांगलादेशी मुस्लिमांच्या संख्येला काबूत आणण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणा आणि सरकार बरेच नवीन प्रयोग आणि प्रयत्न करत आहेत. 

अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री झाल्यापासून मुंबईत रस्त्यांवरील भाजीपाला आणि फळांच्या गाड्यांपासून ते शॉर्मा दुकानांपर्यंत, खाद्यपदार्थांच्या गाड्यांपर्यंत, मांस आणि मासे विक्रेत्यांपर्यंत, अनधिकृत मुस्लिम विक्रेत्यांची उपस्थिती संपूर्ण शहरात अधिकाधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. नवीन आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात अवैध बांगलादेशी घुसखोरांच्या अटकेत वाढ झाली आहे. २०२५ मध्ये शेकडो व्यक्तींना पकडण्यात आले आहे. यात अगदी घरगुती कामवाल्या, हातगाडीवाले, तृतीयपंथीयांचे रॅकेट चालवणारे बांगलादेशी गुंड असे कितीतरी प्रकारचे लोक पकडले जात आहेत. 

केंद्र सरकारने गुप्तचर विभागात ५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे, ज्यात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरीला रोखण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.

परंतु मुंबईकरांसमोर सुरक्षादृष्ट्या काही आवश्यक प्रश्न उभे राहिले आहेत. आपल्या ओला-उबर टॅक्सी चालवणारे हे लोक कोण आहेत? स्विगी आणि झोमॅटोसाठी काम करणारे डिलिव्हरी बॉईज कोण आहेत? अर्बन कंपनीमार्फत दुरुस्ती, साफसफाई किंवा इन्स्टॉलेशनसाठी आपल्या घरात येणारे पुरुष कोण आहेत?

ते पडताळणी केलेले भारतीय नागरिक आहेत की, बनावट आधार कार्ड आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे शहरात राहणारे अवैध घुसखोर आहेत? उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या घराघरांतून सर्वेक्षणासारख्या मोहिमा मुंबईतही राबवण्याची मागणी वाढत आहे. अवैध रोहिंग्या आणि बांगलादेशींना ओळखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.

सुरक्षा तज्ञांनी इशारा दिला आहे की, अनियंत्रित अवैध स्थलांतरामुळे अंतर्गत सुरक्षेला संभाव्य धोका निर्माण होतो. ही चिंता केवळ अवैध वास्तव्याबद्दल नाही, तर दहशतवादी संघटना अशा नेटवर्कचा वापर लॉजिस्टिक्स, निधी, आश्रय किंवा स्लीपर सेलसाठी करण्याची शक्यता आहे. भारतभरात विविध ठिकाणी जसे कि उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड इत्यादी ठिकाणी सरळ बुलडोझर लावून या लोकांना हुसकावून लावण्याचे काम भाजपची सरकारे करत आहेत. भारत सरकारने रोहिंग्या शरणार्थींना बांगलादेशकडे पाठवण्याच्या मोहिमा तीव्र केल्या आहेत, ज्यात शेकडो व्यक्तींना निर्वासित करण्यात आले आहे.

 मुंबईमध्ये भाजपचे किरीट सोमय्या, नितेश राणे इत्यादी मंडळी हा विषय लावून धरत आहेत. बोरिवलीमध्ये संजय उपाध्याय यांनी जवळपास १००० अनधिकृत विक्रेत्यांची दुकाने बंद करण्याची कारवाई करून दाखवली आहे. 

तरीही मुंबईचे आर्थिक, जागतिक महत्त्व लक्षात घेऊन येऊ घातलेले ख्रिसमस आणि निवडणूक या महत्वाच्या काळात नागरिकांना अधिक सावध राहणे गरजेचे आहे.

शहराची सुरक्षा धोक्यात येणार नाही याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पार्श्वभूमी पडताळणी, कागदपत्रांची तपासणी आणि विविध संस्थांमधील गुप्तचर माहितीची देवाणघेवाण मजबूत करणे आवश्यक आहे. याशिवाय, नागरिकांनी संशयास्पद क्रियाकलापांची माहिती पोलिसांना देणे आणि समुदाय स्तरावर सतर्कता वाढवणे गरजेचे आहे. अशा पावलांमुळेच मुंबईसारख्या शहराची सुरक्षा मजबूत होईल आणि भविष्यातील धोक्यांना रोखता येईल.

अन्य लेख

संबंधित लेख