Thursday, October 10, 2024

‘देवाच्या लाठीचा फटका बसतो तेव्हा…’; संजय राऊतांवर भाजपची कडवी प्रतिक्रिया

Share

मुंबई : देवाच्या हातातील काठी दिसत नाही, पण तिचा आवाज येतो. पण त्या लाठीचा जेव्हा फटका बसतो तेव्हा खूपच वेदना होतात, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली आहे. संजय राऊतांना एका मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यावर त्यांनी कडवी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एक्स’ वर पोस्ट करत त्यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

“देवाच्या हातातील काठी दिसत नाही, पण तिचा आवाज येतो. पण त्या लाठीचा जेव्हा फटका बसतो तेव्हा खूपच वेदना होतात. देवाच्या लाठीपासून वाचण्यासाठी कर्म चांगली करा असं संत सांगतात. पण स्वत:ला सगळी अक्कल आहे असे सांगणा-या संजय राऊतांसारख्यांना न्यायालयाव्दारे देवाच्या लाठीचा फटका बसतो,” असे केशव उपाध्ये म्हणाले.
 
“भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरही खोटे आरोप करणा-या संजय राऊतांचे पितळ न्यायालयाने उघडे पाडले. याच संजय राऊत यांच्या विरोधात अन्य तक्रारी पोलीसांकडे आहेत. आता ते बदलापूर प्रकरणातील पिडितेच्या नव्हे तर अक्षय शिंदेच्या मागे ऊभे आहेत,” असेही ते यावेळी म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख