Friday, November 22, 2024

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी

Share

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ४ कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. यंदा कडधान्याच्या क्षेत्रात वाढ झाली असून १ कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड झाली आहे. १ कोटी ९२ लाख हेक्टरवर तृणधान्य, तर १ कोटी ९३ लाख हेक्टरवर गळीत पिकांची पेरणी झाली आहे. ५७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ऊसाची लागण झाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख