Saturday, January 18, 2025

लाडकी बहीण योजना : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत होणार जमा – मंत्री आदिती तटकरे

Share

मुंबई : ‘मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने’चा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळत असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख