Saturday, September 7, 2024

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत

Share

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून तयार करण्यात आलेला मतदारसंघ आहे. राज्यात या मतदारसंघाचा ४८ वा क्रमांक लागतो. या लोकसभा मतदारसंघात शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ हे चार विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर इस्लामपूर आणि शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील आहेत. असा एकूण दोन जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा हा एक लोकसभा मतदारसंघ आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ९ लाख १९ हजार ६४६ पुरुष मतदार आहेत. ८ लाख ८१ हजार ४६६ स्त्री मतदार आहेत. ९१ मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदार संख्या १८ लाख १ हजार २०३ इतकी आहे.

या मतदारसंघातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आमदार आहेत. इचलकरंजी मतदारसंघात कल्लाप्पाण्णा आवाडे हे अपक्ष आमदार आहेत. शिरोळ मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत. हातकणंगले मतदारसंघात राजू आवळे हे काँग्रेसचे आमदार आहेत. शिराळा मतदार संघात मानसिंग नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आहेत. इस्लामपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमदार आहेत.

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात १ लाख ५१ हजार ८९४ पुरुष मतदार आहेत. तर १ लाख ४१ हजार ७६२ स्त्री मतदार आहेत. ३ मतदारांची नोंद तृतीयपंथी अशी आहे. या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान २ लाख ९३ हजार ६५९ इतके आहे.

हातकणंगलेमध्ये सर्वाधिक मतदार
हातकणंगले विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार १ लाख ६८ हजार ७८७ इतके आहेत. तर स्त्री मतदार १ लाख ६० हजार ९४१ इतके आहेत. १८ मतदारांची नोंद तृतीयपंथी अशी आहे. या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार ३ लाख २९ हजार ७४६ इतके आहे. या लोकसभा मतदारसंघात हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत.

इचलकरंजी विधानसभा मतदार संघात १ लाख ५२ हजार ८४२ पुरुष मतदार आहेत. तर १ लाख ४५ हजार ३९६ स्त्री मतदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात ६० मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदार २ लाख ९८ हजार २९८ इतके आहेत.

शिरोळ विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार १ लाख ५७ हजार ६२५ इतके आहेत. स्त्री मतदार १ लाख ५७ हजार २५२ इतके आहेत. २ मतदारांची नोंद तृतीयपंथी अशी आहे. या विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार ३ लाख १४ हजार ८७९ आहेत.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार १ लाख ३६ हजार ८७४ इतके आहे. स्त्री मतदार १ लाख ३२ हजार २३३ इतके आहेत. ४ मतदारांची नोंद तृतीयपंथी अशी आहे. एकूण मतदार २ लाख ६९ हजार १११ इतके आहे.

शिराळा विधानसभा मतदारसंघात १ लाख ५१ हजार ६२४ पुरुष मतदार आहेत. १ लाख ४३ हजार ८८२ स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार ४ आहेत. एकूण मतदार २ लाख ९५ हजार ५१० इतके आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे विद्यमान खासदार असून ते पुन्हा रिंगणात उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे त्यांचे प्रबळ विरोधक आहेत. त्याचबरोबर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटातून घोषणा झालेली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने उद्योजक डी.सी. पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. चार उमेदवार रिंगणात आल्याने या लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख