मुंबई – सोशल मिडियावरून चुकीच्या पध्दतीने प्रवचनाचे संदर्भ देऊन लोकांना भडकविण्याचे काम देशाबाहेरील लोक करत आहेत. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणाचाही माफी मी मागणार नाही आणि केलेलं वक्तव्य मागे घेणार नाही. असं महंत रामगिरी महाराज यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या सुमारे दीड तासच्या प्रवचनातील काही भागाचे संदर्भ वगळून तयार केलेले व्हिडियो प्रसारित करण्यात आले. त्यानंतर ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा…’ यासारख्या घोषणा देत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये धर्मांध लोकांनी रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी दगडफेक करत राज्यात दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला.
हे सगळे प्रयत्न फोल ठरले. कारण हे नरेटीव्ह पसरविणारी सोशल मिडिया अकाऊंट्स ही देशाबाहेरील आहे. भोपाळ मधील एका सोशल मिडिया सेंटरने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. #ArrestRamgiriMaharaj, #ArrestNiteshRane, #ArrestRamgiri, #AllEyesOnIndianMuslims, #Musalman, #Sikandar, #ISLAM, #OurProphetOurHonour, #MaharashtraPolitics या हॅशटॅग्जचा वापर करण्यात आला होता असं या अभ्यास अहवालात नोंदवण्यात आले आहे.