हिंदूंच्या मठ मंदिरांबद्दलचा द्वेष हा मुघल काळापासून आलेला आहे. मुघलांच्या राजनीती वरती व विचारसरणी वरती प्रकाश पडणारे अनेक संदर्भ आपल्याला त्या काळच्या पत्रव्यवहारातून मिळतात इस्लामिक सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जे जे प्रयत्न करण्यात आले ते सर्व प्रयत्न ही मूळ हिंदू संस्कृती बदलून इस्लामिक सांस्कृतिक प्रस्थापित करण्याचा आटोकाट प्रयत्न त्या काळात झाला. या सर्वांची पुनरावृत्ती आज आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहे. धर्मांध औरंगजेबाच्या नावाचे उदातीकरण करणारे त्याचे वंशज आजही समाजात वावरत आहेत याचा प्रत्यय मुंबई येथील मोर्चेच्या वेळेस आपण स्पष्ट पाहिला. ज्या औरंगजेबाने छत्रपती शंभुजी महाराजांना आपला धर्म बदलण्यासाठी अनन्वित अत्याचार केले त्याला श्रेष्ठ मानून त्याचे झेंडे सर्वत्र मिरवले जातात ही खेदजनक बाब आहे.
छत्रपती शंभु महाराजांचा उल्लेख करताना मातब्बर खानाचे पत्र उपलब्ध आहे. कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यानंतर मातब्बर खान संभाजी महाराजांना ‘काफर’ असा उल्लेख करतो व म्हणतो “संभाजी याने धर्मद्वेशामुळे तळ कोकणाचे मदरसे आणि मशिदी उध्वस्त केल्या आहेत”. पुढे तो एके ठिकाणी लिहितो मुसलमान विद्वान आणि धर्मशास्त्रज्ञ परागांधा झाले आहेत (मराठ्यांच्या भीतीमुळे) ते परत आपापल्या गावी आले आहेत याकरिता मशिदी आणि मदरसे असणं सोयीचे ठरेल. यावरून स्पष्ट होतं की मराठ्यांच्या धाकामुळे मुघल भयभीत झालेले आहेत आणि संभाजी महाराजांच्या नंतर त्यांनी पाडलेल्या मशीदी पुन्हा उभ्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवस्थानांना मुसलमानांचा उपग्रह होणार नाही याकडे संभाजी महाराज दक्ष होते १६८० मधील वासुदेव बाळकृष्ण यास पाठवलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात “मुसलमान व हर कोणाचा उपद्रव न लागे ऐसे करणे”. मंदिराच्या दर्शनाला येणाऱ्या तसेच सणसमारंभातील यात्रेकरूंना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी विशेष दक्षता बाळगावी असे संदर्भ संभाजी महाराजांच्या काळातील पत्रात उपलब्ध आहेत. चाफळ आणि सज्जनगड येथील देवस्थानांच्या यात्रेबाबत येसूबाई महाराणी साहेब एका पत्रातून आज्ञा देतात की या यात्रेस कोणीही त्रास देणार नाही याची खबरदारी सैन्यातील अधिकाऱ्यांनी घ्यावी त्यांनी या पत्रात असेही नमूद केले आहे की गावोगावी पत्रे पाठवून लोकांनी यात्रेस यावे असे आव्हान करावे.
शिवाजी महाराजांचे धर्माविषयीचे धोरण संभाजी महाराजांनी पुढे अबाधित राखले. संभाजी महाराजांचे हिंदुत्व हे प्रखर तेजासारखे आहे, ज्यांनी आपल्या आबासाहेबांचे संकल्पित सदैव जपले. देव, देश व धर्मासाठी ज्या संभाजीराजांनी आपल्या प्राणाच्या आहुती दिल्या त्यांच्या नावावर काळे फासून ते मिटवण्याचा प्रयत्न या औरंग्याच्या अवलादी करत आहेत. आज भारतामध्ये होणारे इस्लामिक आक्रमण पुन्हा डोकं वर काढू लागले आहेत अल्पसंख्यांक असलेले आज गुरगुरायला लागलेले आहेत. विविध ठिकाणी मोर्चे निघू लागले आहेत. अलीचे झेंडे फडकवले जात आहेत. पिर अवलिया यांचे उदात्तीकरण करून त्याच्या अनधिकृत मजारी व मशीदी बांधण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात मागील ६४ वर्षात वकबोर्ड कडे एकूण ९२ हजार एकर जमीन जमा झाली आहे. हे एका प्रकारचे लँड जिहादच आहे. आपल्या अमर्याद अधिकारांचा वापर करून विविध राज्यातील अनेक जमिनींवर अतिक्रमण करून अशा जमिनी वक्फ करण्यात आलेले आहेत. तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील तिरूचेथूरई येथील दीड हजार वर्षांपूर्वीचे जुने मंदिर वक्फ च्या नावाखाली दाखवण्यात आले आहे. इस्लाम धर्माच्या स्थापनेच्या अगोदर अस्तित्वात असलेले हे मंदिर हे इस्लामिक आक्रमक गिळंकृत करण्यास पाहत आहेत. महाराष्ट्र मधील सोलापूर येथील एक अनुसूचित वसाहत वक्फ च्या ताब्यात असून जमीन परत मिळवण्यासाठी इस्लाम स्वीकारून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा घटना आदिवासी व दलित समाजात वाढताना दिसत आहेत. सर्व हिंदू समाजचे हे आद्य कर्तव्य समजून एकजुटीने सर्वांनी या विरोधात लढले पाहिजे तरच आपण शिवशंभू महाराजांचे खरे मर्द मावळे आहोत असे संबोधता येईल.
यासाठी शिवरायांचे तसेच शंभूजी महाराजांचे विचार अंगी बाळगणे गरजेचे आहे तरच हा महाराष्ट्र धर्म टिकेल, धर्म टिकला तर देश टिकेल….या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी एैसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे…