Monday, June 24, 2024

विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

Share

Maharashtra Legislative Council Elections 2024 : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपकडून (BJP) तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (kiran Shelar) आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे (Shivnath Darade) यांना भाजपाने संधी दिली आहे. किरण शेलार हे मुंबई तरुण भारत या वृत्तपत्राचे संपादक आहेत. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी (Raj Thackeray), कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून (MNS) अभिजीत पानसेंची (Abhijit Panse) आगोदरच उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे मनसेनं जाहीर केलेला उमेदवार महायुतीचा की, मनसेचा असा प्रश्न उपस्थित झाला होता.

अन्य लेख

संबंधित लेख