Tuesday, December 3, 2024

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन

Share

सकल मराठा समाजाच्यावतीने भर पावसामध्ये बुधवारी काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या वतीने 24 तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून नाशिक दौऱ्यावरती आलेले काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची गाडी अडून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

त्यामुळे झालेला मनस्ताप आणि होत असलेल्या त्रास याचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून बुधवारी शिवतीर्थ येथे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे समन्वयकांनी आणि इतर समाज बांधवांनी सहभाग घेतला होता. दिवसभर उपवास करून हे आंदोलन करण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख