Monday, October 21, 2024

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू राहणार का? मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी पुष्टी केली आहे की, राज्याची प्रमुख योजना, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूच राहणार” असल्याचं त्यांनी स्पष्ट केलय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या योजनेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या. यावर त्यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

अदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे,” असे स्पष्ट सांगितलं आहे.

सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही विनंती त्यांनी केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख