महाविकास आघाडीतील (मविआ) मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात टोला लगावला आहे. या कार्यक्रमात गडकरी यांनी राजकारणातील विविध मुद्द्यांवर बोलताना मविआच्या नेत्यांना लक्ष्य केले.गडकरी म्हणाले, “मविआतील सध्याचा सर्कस आहे, जिथे प्रत्येकजण मुख्यमंत्रीपदाचा दावा करतोय, पण केस नसताना कंगवा फिरवणारे खूपजण आहेत.” त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले की, अनेक नेते अपापले दावे करीत आहेत, परंतु त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा खरा चेहेरा नाही
पुढे बोलताना गडकरी यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “शरद पवार हे मविआचे रिंगमास्टर आहेत. त्यांनीच ही सर्कस सुरू ठेवली आहे. त्यांच्यामुळेच मविआची सर्कस टिकून आहे.” हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून, मविआमधील सध्याच्या राजकीय स्थितीवर प्रकाश टाकते.गडकरी यांचे विधान हे मविआतील अंतर्गत वादांना वाचा फोडणारे आहे, जिथे प्रत्येक पक्ष आणि नेता आपल्या दाव्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मविआमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांचा समावेश असून, सर्वांच्या उमेदवारीच्या मुद्द्यांवरून चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत, गडकरींचे हे विधान मविआच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.