Thursday, October 10, 2024

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी

Share

वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. यामुळे कृषीसह उद्योग क्षेत्राची भरभराट होईल. यातून अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि विकासदर वाढेल. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन गरिबी कमी होण्यास मदत होईल.भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन वर्तमान काळात अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्याची आवश्‍यकता आहे. या जोरावर भारत विश्‍वगुरू होईल,’’ असा ठाम विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला. नानासाहेब परुळेकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील भारताचे भविष्य’ या विषयावर गडकरी यांनी विचार मांडले.गडकरी म्हणाले, ‘‘देशाच्या विकासात कृषी क्षेत्राचा १४, उत्पादन क्षेत्राचा २२ ते २४, तर सेवा क्षेत्राचा वाटा ५२ ते ५४ टक्के आहे. महात्मा गांधी यांनी १९४७ मध्ये ग्रामीण भाग केंद्रस्थानी ठेऊन विकासाची संकल्पना मांडली होती, मात्र गेल्या ७५ वर्षांत शहराकडे स्थलांतर वाढले. दुर्दैवाने समाजात शेतकऱ्यांना दुय्यम दर्जा मिळाला. तंत्रज्ञानाचा वापर करून शेत पिकाच्या माध्यमातूनपेट्रोल, डिझेलला पर्यायी इंधनाची निर्मिती केली तर आयात कमी होईल. त्यातून वाचलेला पैसा शेतकऱ्यांपर्यंत गेला तर त्यांचे जीवन सुखीसमृद्ध होईल. शेतकरी काडीकचरा जाळून टाकत होते, पण त्यापासून इथेनॉलनिर्मिती शक्य आहे. 

अन्य लेख

संबंधित लेख