मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council) नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा शपथविधी रविवार २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात (सेंट्रल हॉल) होणार आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडून आलेले सदस्य योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या सदस्यांचा शपथविधी होईल, असे कळविण्यात आले आहे.
- पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड
- HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू
- PM मोदींनी सामायिक केले प्रेरणादायी सुभाषित; विद्यार्थ्यांमधील प्रतिभेवर व्यक्त केला ठाम विश्वास
- “णमोकार भूमी मानवतेचा संदेश देणारी प्रेरणाभूमी ठरेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
- नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळणार ‘विमान’ वेग! ओझर विमानतळ विस्तारीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन