Friday, October 18, 2024

महादेव जानकर यांचा महायुतीला रामराम; विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय

Share

परभणी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी टोकाचा निर्णय घेत महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची जास्त शक्यता आहे.

महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु होती. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारात न घेतल्याने महादेव जानकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर हे राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्यावर ठाम आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत.

महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणी मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. तिथे ठाकरे गटाचे संजय जाधव हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. जानकर यांच्या निर्णयामुळे मतांचे विभाजन होऊ शकते, विशेषत: ज्या मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचा, जो आरक्षणाचा लाभ मिळवू इच्छितो, तेथे लक्षणीय वर्चस्व आहे. याचा परिणाम भाजपच्या नेतृत्वाखालील युती आणि MVA या दोन्हींवर होऊ शकतो, त्याच्या मतदारांची सहानुभूती कोठे आहे यावर अवलंबून.

धनगर समाजातील लक्षणीय प्रभावासाठी ओळखले जाणारे महादेव जानकर यांची राज्यातील सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना आणि कर्नाटक लगतच्या प्रदेशात मोठी ताकद आहे. जिथे धनगर समाजाची संख्या जास्त आहे तिथे महादेव जानकर यांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. जानकर यांनी महायुतीला रामराम केल्यानंतर महायुतीला मोठा धक्का आहे. जातीय समीकरणांचा विचार करता भाजप आणि महायुती महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात कितपत यशस्वी ठरते हे अस्तुक्याचे असणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख