Wednesday, December 4, 2024

१ लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेले महाराष्ट्रातील दिग्गज

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) च्या निकालामध्ये महायुतीने (Mahayuti) प्रचंड असा विजय मिळवला. महायुतीला तब्बल २३४ जागा तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागेवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात आपले वर्चस्व दाखवत एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्या, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागा मिळवल्या आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने युतीच्या संख्येत 41 जागांचा वाटा उचलला. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत (MVA) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. हा निकाल महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे.

या निवडणुकीत यंदा विविध राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी 1 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजय संपादन करून ऐतिहासिक यश मिळवले आहे. यामध्ये, महायुतीच्या १५ उमेदवारांनी 1 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला. यामध्ये भाजपच्या ८, शिवसेनेच्या ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ उमेदवारांचा समावेश आहे. तर, महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याला 1 लाखाहून अधिक मताच्या फरकाने विजय मिळवता आला नाही.

क्र.विधानसभा मतदारसंघविजयी उमेदवारमार्जिनपराभूत उमेदवार
1.शिरपूरकाशीराम वेचन पावरा
(भाजपा)
१,४५,९४४डॉ.जितेंद्र ठाकूर
(अपक्ष)
2.मेळघाटकेवलराम काळे
(भाजपा)
१,०६,८५९डॉ. हेमंत नंदा चिमोटे
(काँग्रेस)
3.नागपूर पूर्वकृष्णा खोपडे
(भाजपा)
१,१५,२८८दुनेश्वर पेठे
(राष्ट्रवादी – एसपी)
4.बागलाणदिलीप मंगलू बोरसे
(भाजपा)
१,२९,२९७दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी – एसपी)
5.बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)१,००,२५७संजय भोसले (शिवसेना- यूबीटी)
6.चिंचवडशंकर जगताप
(भाजप)
१,०३,८६५राहुल कलाटे
(राष्ट्रवादी – एसपी)
7.कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)१,०३,८६५राहुल कलाटे
(राष्ट्रवादी – एसपी)
8.साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)१,४२,१२४अमित कदम
(शिवसेना – यूबीटी)
9.मालेगाव बाह्यदादाजी भुसे
(शिवसेना)
१,०६,६०६अव्दय हिरे
(शिवसेना- यूबीटी)
10.ओवळा माजीवाडाप्रताप सरनाईक (शिवसेना)१,०८,१५८नरेश मनेरा
(शिवसेना- यूबीटी)
11.कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना)१,२०,७१७केदार दिघे
(शिवसेना- यूबीटी)
12.बारामतीअजित पवार
(राष्ट्रवादी कॉँग्रेस)
१,००,८९९युगेंद्र पवार
(राष्ट्रवादी – एसपी)
13.मावळसुनील शेळके
(राष्ट्रवादी कॉँग्रेस)
१,०८,५६५बापू भेगडे
(अपक्ष)
14.कोपरगावआशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)१,२४,६२४संदीप वर्पे
(राष्ट्रवादी – एसपी)
15.परळीधनंजय मुंडे
(राष्ट्रवादी कॉँग्रेस)
१,४०,२२४राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी – एसपी)

अन्य लेख

संबंधित लेख