पॅरिस ऑलिम्पिक : पॅरिस ऑलिम्पिकमधून (Olympic Games Paris 2024) अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रोत्साहन दिले आहे. पंतप्रधानांनी लिहिलं आहे कि, “विनेश, चॅम्पियन्समध्ये तू एक चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मी अनुभवत असलेल्या निराशेची भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्याच वेळी, मला माहित आहे की तुम्ही लवचिकतेचे प्रतीक आहात. आव्हाने स्वीकारणे हा तुझा नेहमीचाच स्वभाव राहिला आहे. आणखी मजबूत बाणीं परत ये. आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत.”
भारतातील अव्वल कुस्तीपटूंपैकी एक असलेल्या विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी उपांत्य फेरीत क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा 5-0 गुणांनी पराभव केला होता. विनेशच्या या कामगिरीने भारताचं स्पर्धेतील चौथं पदक निश्चित मानलं जात होतं. मात्र आता अंतिम सामन्यापूर्वी ती अपात्र घोषित झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. तिच्या अपात्रतेमुळे तिच्या चाहत्यांना आणि समर्थकांना धक्का बसला, ज्यांना तिच्या खेळातील कामगिरीबद्दल खूप आशा होती.
- गणेशोत्सवाच्या आनंदात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेने भर घातली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती हेच शासनाचे ध्येय: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अमूल्य
- संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदी नियुक्ती
- छत्रपती संभाजीनगर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते १६ महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन