Tuesday, December 3, 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यात आज बैठक

Share

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यादरम्यान आज बैठक होणार आहे. भारत आणि सिंगापूरदरम्यान द्विपक्षीय भागीदारीसंदर्भातील प्रगतीचा ते आढावा घेतील तसंच दोनही देशांचे हितसंबंध असलेल्या प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील मुद्यांवर आपले विचार मांडतील.

उभय नेत्यांनी भारत-सिंगापूर राजनैतिक भागीदारी तसचं दोन्ही देशांशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक समस्यांचा आढावा घेतला. यावेळी दोन्ही देशांनी आरोग्य आणि औषधे, कौशल्य विकास, सेमी कंडक्टर आदी क्षेत्राशी संबंधित सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

प्रधानमंत्री आपल्या दोन देशांच्या दौऱ्यातील ब्रुनोईचा दौरा आटोपून काल सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी मोदींसाठी संध्याकाळच्या भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोनही देशांची मैत्री विशेष असून विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशांत म्हटलं आहे.

आज ते सिंगापूरचे राष्ट्रपती आणि इतर अनेक मान्यवरांच्या भेट घेणार आहेत. तसंच AEMया सेमीकंडक्टर टेस्ट इनोव्हेशनचे काम करणाऱ्या कंपनीला भेट देणार आहेत तसंच इतर क्षेत्रातील उद्योजकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी सहा वर्षांनंतर सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूर हा ASEAN समूहातील भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे आणि थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रमुख स्त्रोत आहे. दरम्यान आरोग्य आणि उपचार तसंच सेमीकंडक्टर क्षेत्रातील सहकार्यासाठी दोन्ही देशांनी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख