Saturday, May 25, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो

Share

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या (१४ मे बुधवार) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पूत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात सभा ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान यांची उद्या दुपारी कल्याणमध्ये (Kalyan) जाहीर सभा होणार आहे. कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर ही जाहीर सभा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत. घाटकोपर-विक्रोळी परिसरात पंतप्रधानांचा रोड शो (Roadshow) होणार आहे.

दरम्यान, या रोड शो ला विक्रोळीच्या अशोक सिल्क मिल्कपासून सुरूवात होईल, तर पार्श्वनाथ चौकाजवळ हा रोड शो संपणार आहे. बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी विक्रोळी मध्ये येतील. यानंतर 6.45 वाजता रोड शोला सुरूवात होईल. रात्री 8.10 मिनिटांनी पंतप्रधान विमानतळावर जातील आणि तिथून त्यांचं प्रस्थान होईल.

अन्य लेख

संबंधित लेख