Friday, November 8, 2024

सोलापूरात काँग्रेसपुढे एमआयएम, माकपसह बंडखोरीचे आव्हान

Share

सोलापूर, शहर मध्य मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक केलेल्या प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आणि दिल्लीला गेल्या. त्यानंतर काँग्रेसमधील मोची, मुस्लिम कार्यकर्त्यांना उमेदवारी खुणावू लागली व त्यांनी तशी मागणी देखील पक्षाकडे केली. काही माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात स्वत:चे फलक भावी आमदार म्हणूनही झळकवले. तर ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, नाहीतर वेळप्रसंगी बंडखोरीचाही इशारा दिला आहे.

परंतु, इंडी आघाडीत ‘शहर मध्य’मधून ‘माकप’चे माजी आमदार नरसय्या आडम यांना उमेदवारीची आशा होती. पण त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री होताच त्यांनी आता स्वत:च्याच पक्षाकडून लढण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांनी देखील या मतदारसंघावर दावा केला आहे, पण त्यांनाही अद्याप तो तिढा सोडविता आलेला नाही.सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. मोची समाजाचे मतदान देखील लक्षणीय आहे. या सर्वांची घडी बसवून त्यांच्या मदतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी लाटेतही विजय मिळवला आणि २०१९च्या निवडणुकीत विजयाची हॅट्रिकही साधली.

अन्य लेख

संबंधित लेख