मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) २ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्राला (Maharashtra) भेट देणार आहेत. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वारणानगर, कोल्हापूर येथे श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार ३ सप्टेंबर रोजी पुणे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) २१ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच मुंबई येथे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
बुधवार ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर, लातूर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. उदगीर येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यालाही त्या मार्गदर्शन करणार आहेत.
- शक्तिपीठ महामार्गाचे काम तत्परतेने सुरु करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
- महाराष्ट्रातील विजयाचे शिल्पकार भाजपचे कार्यकर्ते – अमित शाह
- विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक
- संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- १२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध