Monday, October 21, 2024

पुणे विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, इच्छुकांची रस्सीखेच तीव्र

Share

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रमध्ये राजकीय वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष निवडणुकांसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजून सुटताना दिसत नाही. अशातच भाजपने काल त्यांच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यामध्ये पुणे विधानसभा मतदारसंघातील आठ पैकी तीन जागेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
शिवाजीनगर मतदारसंघातून पुन्हा सिद्धार्थ शिरोळे, पर्वती मतदारसंघातून माधुरीताई मिसाळ कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत दादा पाटील यांना तिकीट मिळाले आहे.

वडगाव शेरी, खडकवासला, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे अजून जाहीर व्हायची आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघातील पाच मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर व्हायची आहेत. ह्या पाच मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत तर, उरलेल्या तीन मतदारसंघांमध्ये म्हणजेच हडपसर, कसबा पेठ आणि वडगाव शेरी मतदार संघात अनुक्रमे दोन मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे आमदार सुनील कांबळे आहेत तसेच खडकवासला मतदारसंघातून बापूराव तापकीर हे आमदार आहेत. मात्र वडगाव शेरी मतदार संघात सध्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार आहेत मात्र तिथे जगदीश मुळीकही इच्छुक उमेदवार आहेत एकेकाळी भाजपचा गड म्हणून ओळखले जाणारा कसबा मतदारसंघांमध्ये सध्या काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आमदार होते. मात्र तिथे भाजपचे हेमंत रासने आणि धीरज घाटे इच्छुक उमेदवार आहेत.

त्यामुळे आता सर्वांना एक प्रश्न पडला आहे. महायुतीमुळे एकाच सत्तेत असलेले वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे भाजपचे इच्छुक आमदार जगदीश मुळीक यांना संधी देतील का? आणि खडकवासल्यात कोण तिकीट मिळवणार. हे लवकरच कळेल.

अन्य लेख

संबंधित लेख