Thursday, September 19, 2024

बा राहुल गांधी, निदान सप्टेंबर महिना तरी सोडायचा ना !!

Share

आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद आणि हिंदू वैश्विक चिंतन सोडून काहीही आठवत नाही.
आणि नाहीच आठवणार.

कोणाही हिंदूला आज हिंदुत्व, वैश्विक एकात्मतेचा आधार सहजीवन हे चिंतनच आठवणार.
जगाला सुद्धा विवेकानंद आणि त्यांनी सांगितलेला हिंदू धर्मच आठवणार.

असे असूनही, हिरेजडीत लखलखते तत्वज्ञान स्मरणाचा हा दिवस असूनही मला आज गारगोटीचेही स्मरण झाले आणि मेल्याहून मेल्यासारखे झाले.

एकीकडे 11 सप्टेंबर 1893 आणि दुसरीकडे 11 सप्टेंबर 2024.

सध्या या ११ सप्टेंबरला संस्कृती शब्दाची ओळख फक्त कम सप्टेंबरची ट्यून ऐकण्याएवढीच ज्या नररत्नाला आहे, असा एक भारतीय नेता सध्या त्याच अमेरिकेत आहे आणि बालिशपणाचे प्रदर्शन मांडत फिरत आहे.

बा राहुल गांधी, तुला अमेरिकेत जाऊन बौद्धिक विकृतीचा एवढाच पाऊस पाडायचा होता तर निदान सप्टेंबर महिना तरी सोडायचा ना. तुला हिंदू धर्म, तत्वज्ञान, समाज याचा तिरस्कार आहे हे समजू शकतो, पण हिंदुंचा वैश्विक तत्वज्ञान विजय दिवसही आनंदाने साजरा करु दिला नाहीस आणि मलाही तुझ्यासारख्या गारगोटीचा विचार करावा लागला.

पारतंत्र्य, हतबलता, आत्मविस्मृतता या सर्वांनी ग्रस्त असलेल्या हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करताना त्या महामना स्वामी विवेकानंदानी भारताला ओज दिला आणि विश्वाला सहजीवनाची ग्वाही दिली. आणि आज आपण काय बरळताय? नशीब स्वामी विवेकानंदांची ओळख नसल्याने त्यांचा विकृत वापर तरी तुमच्याकडून झाला नाही.

पण काय बोलला आहेस तिथे. आरक्षण रद्द करु? अरे, तू भारतीय राज्यघटनेविषयी बोलत आहेस, तेही परकीय भूमीवर. जगाला आम्ही राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करतो हे सांगायचे असते आणि तू तर या देशाचा सन्मान वाढवायचा सोडून अब्रू वेशीवर टांगायला निघालास? म्हणून संस्कृती माहिती असावी लागते. त्यासाठी रामायण महाभारताची माहिती असावी लागते. गीता सार माहित असावे लागते. तर कळते. की वयं पंचादिकम शतं म्हणजे काय?

म्हणून म्हटले की कशाला रे ११ सप्टेंबर या हिंदू स्वाभिमान दिनी त्या अमेरिकेत तडफडलास. आम्हाला Brothers & Sisters of America हे जगाला पुलकित केलेले शब्द आठवू दे. सहजीवनाच्या मंत्राने आम्हाला भावविभोर होऊ दे. नको तुझे गारगोटी विचार दर्शन.

एक काम कर. बाळा राहुल गांधी तू परत ये. तुझ्या विदुषकी वर्तनाचा आनंद आम्ही नंतर कधी तरी घेऊ. सध्या आम्हाला स्वाभिमानी हिंदूच राहु दे. त्या विश्वचिंतक स्वामी विवेकानंद यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहु दे.

तुझ्याकडून याहून अधिक अपेक्षा करण्याचा मूर्खपणा मी करणार नाही.

भारतासाठी, हिंदू समाजासाठी ११ सप्टेंबर म्हणजे फक्त विवेकानंद आणि विवेकानंदच.

सुनील देशपांडे
(लेखक ब्लॉगर असून विविध सामाजिक विषयांवर ते लेखन करतात)

अन्य लेख

संबंधित लेख