Sunday, October 13, 2024

“राहुल गांधी नंबर वन दहशतवादी”- रवनीत सिंग बिट्टू

Share

राहुल गांधी यांनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शिख कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. परंतु, त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल गांधी देशातील नंबर वन दहशतवादी असल्याची टीका रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी केली.

यासंदर्भात बिट्टू म्हणाले की, जे लोक नेहमी मारण्याच्या गोष्टी करतात, जहाजे आणि रेल्वे उडवून देण्याची भाषा करतात असे लोक राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.राहुल गांधी हे देशाचे सर्वात मोठे शत्रू असल्याचेही बिट्टू यांनी म्हटले आहे. राहुल गांधी भारतीय नाहीत, त्यांनी आपला बहुतांश वेळ बाहेर घालवला आहे.

परदेशात जाऊन सर्व काही चुकीचे बोलतात म्हणून त्यांना आपल्या देशावर फारसे प्रेम नाही. जे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, फुटीरतावादी, बॉम्ब, बंदुका आणि स्फोटके बनवण्यात तरबेज आहेत, त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेतील विरोधी पक्षनेते झाले आहेत.

कधी ते शीखांच्या असुरक्षिततेबद्दल बोलतात तर कधी समाजाच्या विघटनाबद्दल बोलतात. त्यांचे असे वर्तन माफ करण्यालायक नाही असे बिट्टू यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांना गांभीर्य नसून राहुल आणि त्यांच्या पक्षाचे इतर नेते, सगळेच देश तोडण्यात गुंतले आहेत. काँग्रेसला देशाच्या सुरक्षेची आणि कोट्यवधी लोकांच्या हिताची अजिबात चिंता नाही. केवळ मतांसाठी
काँग्रेस समाजात अशांतता पसरवण्यात गुंतली आहे. मी काँग्रेसला खूप जवळून पाहिले आणि तपासले आहे. मी काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा खासदार झालो आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजपच्या मूलभूत तत्वांनी प्रभावित होऊन आपण भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये सहभागी होऊन मी रेल्वेच्या क्षेत्रात देशवासीयांची सेवा करत असल्याचे बिट्टू यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख