Sunday, May 26, 2024

तारीख आणि ठिकाण ठरलं; राज ठाकरे नारायण राणेंसाठी सभा घेणार

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचारसभा कधी घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहेत. येत्या 4 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची कणकवली येथील उप रुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. नारायण राणे यांची लढत ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्याशी होणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उदय सामंत उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी सभेसाठी राज ठाकरे अनुपस्थित असल्याची आपल्या मनातील खंत बोलून दाखवली होती. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीयेत, त्यामुळे त्यांची आठवण येते, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. आता राज ठाकरे मैदानात उतरल्यास नारायण राणे यांच्या प्रचाराला आणखीनच बळ आहे. 

अन्य लेख

संबंधित लेख