Tuesday, December 23, 2025

“राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी!”

Share

मुंबई : शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच, भाजपने यावर अत्यंत तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला असून, उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणे महागात पडू शकते, असे संकेत दिले आहेत. “नंतर नगरसेवक पळवले जातील,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘बंद खोलीतील वचना’चा दिला दाखला

सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या जुन्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आज म्हणे ठाकरे बंधूंची युती घोषित होणार… पण राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी! आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या, नाहीतर नंतर अचानक मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या बंद खोलीत वचन दिलं होतं सांगून, मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील.”

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी ‘बंद खोलीत दिलेल्या वचना’चा संदर्भ देत भाजपसोबतची युती तोडली होती. याच घटनेची आठवण करून देत उपाध्ये यांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

केशव उपाध्ये यांनी आपल्या विधानातून सुचवले आहे की, उद्धव ठाकरे सत्तेसाठी कोणालाही धोका देऊ शकतात. मनसेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भावनिक साद घालून किंवा ‘वचना’चा खोटा संदर्भ देऊन राज ठाकरेंचे अस्तित्व संपवतील, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

राज ठाकरेंना सावधानतेचा इशारा

उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “गरज संपली की लाथ मारणे ही त्यांची (उबाठा) जुनी सवय आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी या नव्या मैत्रीत अधिक सावध राहणे गरजेचे आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या विधानातून सुचवले आहे की, उद्धव ठाकरे सत्तेसाठी कोणालाही धोका देऊ शकतात. मनसेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भावनिक साद घालून किंवा ‘वचना’चा खोटा संदर्भ देऊन राज ठाकरेंचे अस्तित्व संपवतील, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख