Monday, January 12, 2026

अरेरे, राज तू हे काय बोललास?

Share

काल रविवारी, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना(उबाठा), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शप) यांची संयुक्त प्रचार सभा पार पडली.

या सभेत बोलताना मनसेचे संस्थापक पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाषेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. सोबत तर्कशास्त्राच्या देखील चिंधड्या उडवल्या.

तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात त्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना मुंबई संदर्भात केलेल्या “मुंबई हे फक्त महाराष्ट्रातील नसून, आंतरराष्ट्रीय शहर आहे” या एका विधानातील “मुंबई हे फक्त महाराष्ट्रातील नसून” एवढाच तुटक संदर्भ घेऊन राज ठाकरे अन्नामलाई यांच्यावर तुटून पडले.

अन्नामलाई यांचा उल्लेख त्यांनी “रसमलाई” असा केला ही शाब्दिक कोटी त्यांनी आपल्या स्वभावानुसार केली. अन्नामलाईसुद्धा या कोटीवर हसले असते. पण पुढे राज ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख “भ*वा” असा केला. तो निश्चितच निषेधार्ह आहे. कदाचित गेल्या २० वर्षात कधीच जमली नव्हती एवढी या आपल्या सभेला जमलेली गर्दी बघून बहुदा राज ठाकरे चेकाळले असावेत. पण ती गर्दी निव्वळ मनसैनिकांची नव्हती. त्या गर्दीत मोठा वाटा “भाईजान”च्या मावळ्यांचा होता हे ते विसरले असावेत.

राजकीय विरोधासाठी आपण अपशब्द वापरायचे आणि समोरून टोल्याला प्रति टोला मिळाला की, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या खालावलेल्या पातळीवर ज्ञानामृत पाजायचे. याला राजकारणातील भ*वेगिरी नाही म्हणायचे तर काय…?

अन्नामलाई हे IPS अधिकारी आणि बंगलोरचे पोलीस आयुक्त होते. आयुक्तपदाचा राजीनामा देऊन ते भाजपमध्ये सामील होऊन राजकारणात उतरले. भाजपसाठी तामिळनाडू हे राज्य म्हणजे दगडावर शेती करणे आहे. अन्नामलाई यांनी ते आव्हान स्वीकारले. द्रमुकच्या राज्य सरकारशी टक्कर घेतली. ज्या तामिळनाडूत भाजपला कधी ५ ते ५.५% वर मते मिळाली नव्हती त्या तामिळनाडूत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जवळपास ११.२५% मते मिळाली. अन्नामलाई यांना राजकारण बरोबर कळते. त्यांच्या वाक्याच्या मागच्या पुढच्या विधानाचा संदर्भ घेतला तर अन्नामलाई यांचा मुंबई बाबतचा निर्मळ हेतू ध्यानात येतो. पण ज्यांना केवळ भाषिक द्वेषाचेच राजकारण करायचे आहे त्यांना मात्र आयते कोलीत मिळाले.

“हटाव लुंगी बजाव पुंगी” चा आपला खानदानी कंड शमवण्यासाठी राज ठाकरे यांनी अन्नामलाई यांना जाहीरपणे “भ*वा” म्हणणे हे त्यांच्या राजकीय वैफल्याचे लक्षण तर आहेच पण, त्याचबरोबर त्यांच्या राजकीय मूर्खपणाचे देखील द्योतक आहे. राज ठाकरे यांच्या या अपशब्दाने मुंबईतील केवळ तामिळ भाषिकच नाही तर समस्त अन्य प्रांतीय अमराठी भाषिक मतदार भाजप प्रणित महायुतीच्या पारड्यात आणून सोडला आहे.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी सगळ्यात जास्त टार्गेट केले ते उद्योगपती गौतम अदानी यांना. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून गौतम अदानी यांचे साम्राज्य महाराष्ट्रात कसे कसे विस्तारत गेले. आज जवळपास निम्मा महाराष्ट्र अदानी समूहाने कसा व्यापला आहे. त्याचा एक नकाशा राज ठाकरे यांनी दाखवला.

राज ठाकरे यांची एक “रिसर्च टीम” आहे म्हणे. त्या रिसर्च टीमने हा नकाशा तयार करून आपल्या साहेबांना सभेच्या दिवशी दुपारी उठल्यावर दाखवला असावा. डोळे चोळतच साहेबांनी तो बघितला आणि तसाच तो नकाशा ते सभेला घेऊन आले असावेत. यामध्ये थोडा वेळ मिळाला असता तर राज ठाकरे यांनी आपल्या रिसर्च टीमला देशात अदानी समूहाने कुठे कुठे आपले साम्राज्य स्थापन केले आहे याचा देखील नकाशा बनवायला सांगितलं असता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात राज ठाकरे यांच्या चुलत भावाच्या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची राज्य सरकारे सर्वात जास्त आघाडीवर आहेत हे त्यांच्या लक्षात आले असते.

सिमेंट व्यवसायात अदानी पूर्वी कधीच नव्हते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता ते सिमेंट व्यवसायात आले. हे राज ठाकरे यांचे तर्कशास्त्र समजण्यापलीकडचे आहे. उद्योगपती हा नफा मिळेल त्या व्यवसायात उतरतो. प्रत्येक नवीन क्षेत्रात सुरुवात करताना कोणताही उद्योगपती हा नवीनच असतो. पूर्वानुभव ही व्यवसायाची अट नसते. गुंतवणूक करून नफा कमवण्याच्या शक्यते बरोबरच तोटा सोसण्याची जोखीम देखील उद्योगपतीच घेत असतो.

कोहिनूर मिलच्या जागेवर कोहिनूर स्क्वेअर बांधण्यासाठी राज ठाकरे यांना तरी बांधकाम क्षेत्रातला कुठला पूर्वानुभव होता…? असा मुंबईकरांचा त्यांना सरळ सवाल आहे.

इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घ्यावी लागेल की, गुणवत्ता असल्याशिवाय कॉर्पोरेट क्षेत्रात असे साम्राज्य उभे करता येत नाही. इस्त्रायलने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आणि कार्गो कंटेनरच्या वाहतुकीत इस्त्रायल मधील सर्वात मोठ्या बंदरातील दुसऱ्या क्रमांकाच्या हायफा बंदराचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे सोपवले आहे. इस्त्रायल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कितीही जिव्हाळ्याचे संबंध असले तरी मोदीजींनी आपल्या मित्रासाठी कितीही गळ घातली असती तरी गुणवत्तेशिवाय इस्त्रायलने अदानी समूहाला दारात उभे देखील केले नसते. पॅलेस्टाईनच्या दृष्टीने इस्त्रायल मग्रूर असेल पण तो भोटांचा देश नाही. नुसत्या कोणाच्यातरी वशिल्याने २०५४ सालपर्यंत आपले एक महत्त्वाचे बंदर अदानी समूहाकडे सोपवण्याएवढे तर ते भोट निश्चितच नाहीत.

राज ठाकरे यांच्या या नकाशावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्रात अदानी समूहाने रोजगाराच्या अपरिमित संधी उपलब्ध केल्या आहेत. अन्यथा अदानी समूहात काम करणाऱ्या या सगळ्या कर्मचाऱ्यांना टोलनाके फोडण्याचा, मुस्लिम बहुल वस्तीतील उर्दू सोडून अन्य भारतीय भाषांतील किंवा इंग्रजीतील पाट्या खळळ् खट्याक करण्याचा किंवा वडापावच्या गाड्या लावण्याचा पूर्णवेळ व्यवसाय करावा लागला असता. याबद्दल राज ठाकरे यांनी गौतम अदानी यांचे आभारच मानले पाहिजेत. कदाचित ते आभार मानण्यासाठीच ऋणमोचनासाठी. ठाकरे कुटुंबीय गौतम अदानी यांना अधून मधून भेटत असावे. मुंबईकरांच्या चाणाक्ष नजरेतून हा विरोधाभास सुटलेला नाही.

आश्चर्य म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून अदानी समूहावर हे शरसंधान सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे जेष्ठ नेते जयंत पाटील व्यासपीठावर चिडीचूप बसले होते. नुकतेच गौतम अदानी बारामतीला पवार कुटुंबीयांच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शिक्षण संस्थेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी जाऊन आले होते. संपूर्ण पवार कुटुंबीयांनी गौतम अदानींचे जोशपूर्ण स्वागत केले होते. जयंत पाटलांच्या साहेबांच्या नातवाने तर गौतम अदानींच्या गाडीचे सारथ्य केले होते. सुप्रियाताई सुळे गौतम अदानींना आपला थोरला भाऊ मानतात. अदानी आणि पवार कुटुंबीयांच्या ऋणानुबंधांच्या गाठी या जन्मीच्या नसून जन्मोजन्मीच्या असाव्यात असेच वाटते. त्या गौतम अदानींवर राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तुफानी हल्ला चढवावा आणि जयंत पाटील यांनी तो मान खाली घालून ऐकावा? हतबल जयंत पाटील मनातल्या मनात चरफडत म्हणाले असतील राज, हे तू काय बोललास?

यापेक्षा शरद पवार यांच्या राजकारणाची अधोगती दुसरी काय असावी?

मुंबईत राहणाऱ्या अन्य प्रांतीय अमराठी भाषिक हिंदूंचा निव्वळ भाषेवरून “परप्रांतीय” द्वेष करणाऱ्या राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात मुंबईत गेल्या १० वर्षांत पद्धतशीरपणे वसवलेल्या बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्यांबद्दल मात्र एक अवाक्षर उच्चारले नाही. अन्य प्रांतीय हिंदूंना दादागिरी दाखवणाऱ्या या राजकीय पक्षाची “मुसलमान” हा विषय निघाला की टर्रर्रकन फाटते अशीच सर्वसामान्य मुंबईकरांची धारणा झाली आहे. कालच्या शिवतीर्थावरच्या राज ठाकरे यांच्या भाषणाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

१६ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सपाटून माती खाल्ल्यावर महापालिकेची पुढची निवडणूक ५ वर्षांनी होणार आहे. तोपर्यंत राज ठाकरे यांची मनसे आणि त्यांच्या “रिसर्च टीम”ला काहीही काम नसेल. (अर्थात ते टिकले तर) तोपर्यंत राज ठाकरे यांनी आपल्या “रीसर्च टीम”ला अदानी समूहाच्या नकाशासारखा केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रात किती ठिकाणी बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्ये पद्धतशीरपणे वसवले गेले आहेत याचा एक नकाशा बनवायला सांगावा. आपली “रिसर्च टीम” योग्य प्रकारे काम करते आहे की नाही याची खातर जमा करण्यासाठी एक दिवस त्यांनी झोपमोड होऊ न देता संध्याकाळी आपल्या घरापासून सेना भवन वरून दादर रेल्वे स्थानकापर्यंत फेरफटका मारून यावा. दोन-चार फेरीवाल्यांकडून खरेदीच्या नावाखाली मराठीत थोडी घासाघीस करावी.

आमची खात्री आहे, शिवतीर्थावर पुढची सभा राज ठाकरे बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्यांच्या साम्राज्यावर आघात करण्यासाठी आयोजित करतील आणि त्या सभेत अन्नामलाई यांना वापरलेली भ*वा ही मंत्रपुष्पांजली ते या घुसखोरांसाठी वापरतील आणि मुंबईकरांना ओरडून सांगतील
जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी!

– मालवणी खवट्या

अन्य लेख

संबंधित लेख