Saturday, July 27, 2024

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

Share

राज ठाकरे : देशभरात सर्वत्र श्रीराम नवमीचा उत्साह आहे. यंदाची रामनवमी (RamNavami) सर्वांसाठीच खूप खास असणार आहे. शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच राम नवमी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देतांना राज ठाकरेंनी श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या राजकीय पक्षांना टोला लगावला आहे.

“भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो, असा टोला त्यांनी नाव घेता काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला लावलेला दिसतो?

राज ठाकरे पुढे म्हणाले कि, धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो. पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या शुभेच्यांच्या संदेशात म्हंटले आहे.

NB मराठीच्या WhatsApp चॅनल फॉलो करा : https://whatsapp.com/channel/0029VaWO0HLCRs1iZlueP42F

अन्य लेख

संबंधित लेख