Tuesday, September 17, 2024

संजय राऊतांकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी; महिलेचे ईडी ला पत्र

Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी संजय राऊतांकडून वारंवार बलात्कार आणि जीवे मारण्याची धमक्या देण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मला वारंवार जीवे मारण्याची धकमी दिली जात आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी आपल्याला वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचं म्हटलं आहे. “पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मी साक्ष दिली आहे. या साक्षीतील माझे जबाब मी बदलावेत, यासाठी मला धमकावलं जात आहे,” असा मजकूर असणारं पत्र स्वप्ना पाटकर यांनी ईडीला लिहिलं आहे.

या पत्रामुळे आता संजय राऊतांच्य अडचणीत वाढ झाली आहे

अन्य लेख

संबंधित लेख