Thursday, April 3, 2025

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती स्थापन

Share

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समिती स्थापन केली आहे. समितीचे निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड करण्यात आली असून या समितीत राज्यातले विद्यमान मंत्री आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/C422kYvopMa/?utm_source=ig_web_copy_link

यामध्ये मंत्री मंडळातील माझे अनुभवी सहकारी, महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मदतीने समाजातील सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेऊन एक विश्वास दर्शक जाहीरनामा पक्षाच्या वतीने सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच पक्षाने दिलेली ही जबाबदारी आम्ही सामुहिकरीत्या समर्थपणे पार पाडू असा मला विश्वास आहे.

अन्य लेख

संबंधित लेख