Thursday, September 19, 2024

(Reservation) आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) निषेधार्थ रिपाइंदेशभर आंदोलन तीव्र करणार – रामदास आठवले

Share

अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतातील आरक्षण (Reservation) संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. राहुल गांधी यांचे आरक्षण (Reservation) विरोधी वक्तव्य हे संविधानाचा अवमान करणारे आहे. राहूल गांधींचे आरक्षण (Reservation) विरोधी वक्तव्य संविधानकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे राज्यात आणि संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्ष राहुल गांधींचा तीव्र निषेध करीत आहे. देशभरात रिपब्लिकन कार्यकर्ते राहुल गांधींचा तीव्र धिक्कार करून आपल्या भावना व्यक्त करतील. रिपब्लिकन पक्ष देशभर राहुल गांधींच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडत असल्याची घोषणा काल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. काल मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण
कोणीही संपवू शकत नाही. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत भारताचे संविधान राहील आणि संविधानाने दिलेले
आरक्षण राहील.आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो. खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरुद्ध राज्यभर आणि संपूर्ण देशात निषेध आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.

आरक्षण विरोधी वक्तव्य केल्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा माफी मागितली पाहिजे. काँग्रेसच्या मित्रपक्षांनी राहुल गांधीना त्यांची चूक दाखवली पाहिजे त्यांच्या चुकीच्या वक्तव्यावर पडदा टाकू नये अशी सूचना रामदास आठवले यांनी केली.

सामाजिकदृष्ट्या भारतात सामंजस्य निर्माण झाल्यानंतर सामाजिक आरक्षण संपवण्याचा निर्णय काँग्रेस घेईल असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्यातून राहुल गांधींनी काँग्रेस ही आरक्षणविरोधी असल्याचेच उघड केले आहे.काँग्रेस सर्वाधिक काळ देशात सत्तेत राहिली आहे.त्यांच्या काळात दलितांवर अधिक अत्याचार झाले आहेत. आजही दलितांवर अत्याचार होतात.त्यामुळे दलित आदिवासी मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे. आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल गांधीना गरज काय होती,असा सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.

आरक्षण संपविण्याचा भाषा करणाऱ्या राहुल गांधींना दलित आदिवसी मागासवर्गीय धडा शिकवतील असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हे काँग्रेस नेते राहुल गांधींचे उद्योग आहेत. भारतात लोकतंत्र नाही असे परदेशात जाऊन बरळणे चूक आहे.लोकतंत्र आणि आरक्षणबाबत परदेशात जाऊन चुकीची वक्तव्य करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे रामदास आठवले म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख