रशिया युक्रेन मधील युद्ध पुन्हा एकदा सुरू झाले आहे गेल्या 24 तासात युक्रेन वर रशियाने 70 पेक्षा अधिक हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यातील मृतांचा आकडा हा 11 असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
रशिया युक्रेन मधील युद्ध हे गेली दोन वर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. यामध्ये रशियाच्या न्यूज एजन्सी आरआयए दिलेल्या माहितीनुसार रशियाने गेल्या 24 तासात युक्रेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहा रॉकेट दागले आहे आणि सत्तरहून अधिक बॉम्ब हल्ली केले आहेत. या हल्ल्यामुळे युक्रेनची वीजयंत्रणा कोलमडली आहे. यामुळे सुमारे १ लाख लोक विजेशिवाय जगत आहेत. रशिया सतत वीज प्रकल्पांना लक्ष करत आहे.
यूक्रेन च्या वृत्तवाहिनी नुसार युक्रेननी केलेल्या परत हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1200 असून या मध्ये रशियातील सैनिक व नागरिकांचा समावेश आहे.
2022 पासून चाललेल्या या युद्धामध्ये आत्तापर्यंत एकूण दहा लाखाहून अधिक नागरिकांनी व सैनिकांनी आपला जीव गमावला आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेला युद्धकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.