भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘कथक पाठशाला’ आयोजित ‘संत गाथा’ (Sant Gatha) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत काव्यावर आधारित शास्त्रीय नृत्यरचना यावेळी सादर करण्यात आल्या. ‘संत गाथा’ या कार्यक्रमात १६ नृत्य संस्थांनी आपले नृत्य सादरीकरण केले. संत साहित्यावर अतिशय नावीन्यपूर्ण रचना आणि नृत्यप्रकार सर्व कलाकारांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. पुण्यात भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रसिकांना तो विनामूल्य खुला होता.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे, डॉ. निलीमा देशपांडे -हिरवे, कथक पाठशालेच्या संस्थापक नेहा मुथियान आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्वेता राजोपाध्ये, ऋचा ढेकणे यांनी निवेदन केले. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर झालेला हा २१८ वा कार्यक्रम होता.
- चेकअपनंतर एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर; स्वतः दिली आरोग्याबाबत माहिती
- एकनाथ शिंदेंची प्रकृती खालावली; ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू
- भाजप नेते गिरीश महाजन यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट; युतीतील स्थिती स्पष्ट केली
- उपमुख्यमंत्री होणार का? श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
- महाराष्ट्रातील भाजप पक्षनेत्याची निवड; विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त