Thursday, November 21, 2024

विद्यार्थ्यांनी लुटला अंतराळ विज्ञान प्रदर्शनाचा आनंद

Share

दिनांक २३ ऑक्टोबर २०२४, प्रतिनिधी. – पुणे महानगरातील कात्रज, आंबेगाव येथे बालगोकुलम् , लेक विस्टा सोसायटी आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त प्रयत्नातून Space On Wheel हे प्रदर्शन बुधवारी, दिनांक २३ ऑक्टोबर रोजी लेक विस्टा सोसायटी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी १०.०० वाजता लेक विस्टा सोसायटीचे पदाधिकारी – सदस्य, शालेय विद्यार्थी, पालक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच बालगोकुलम् कार्यकर्ते यांच्या उपस्थित या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनास शालेय विद्यार्थ्यांचा , पालकांचा , तसेच शिक्षक गणांचा अत्यंत उत्साही प्रतिसाद होता.

मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहण्यास आलेल्या विद्यार्थी, पालक तसेच शिक्षक गणांची बैठक व्यवस्था लेक विस्टा सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये करण्यात आलेली होती. एका वेळेस १० ते १२ विद्यार्थी स्पेस ऑन व्हील्स (SOW ) प्रदर्शनीय बस मध्ये प्रवेश करून महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवकांना प्रश्न विचारून इस्रोच्या विविध अंतराळयान आणि उपग्रहांच्या मॉडेल्सची माहिती घेत होते.

या प्रदर्शनात SLV3, ASLV, DSLV, GSLV, RLVTD, AARYBHAT, ROHINI, BHASKARA, APPLE, HEAT SHIELD इत्यादी उपग्रह आणि अवकाशयानांची मॉडेल पाहण्याचा विद्यार्थी आणि पालकांनी आनंद लुटला. ह्या सर्व कार्यक्रमाची व्यवस्था करताना बालगोकुलमचे सर्व शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक यांच्यामध्ये अतिशय उत्साह दिसत होता.

लेक विस्टा सोसायटी क्लब हाऊसमध्ये प्रतीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांची प्रश्न मंजुषा घेऊन बक्षिसे देण्यात आली. रात्री ८.३० वाजता आभार व्यक्त करून प्रदर्शनाची सांगता झाली.

परिसरातील पाच शाळांमधील जवळपास १४०० विद्यार्थी आणि शिक्षक वृंद तसेच आसपासच्या अनेक सोसायट्यांमधील ८०० नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली. लेक विस्टा सोसायटी मधील ४८ नागरिकांनी तसेच ३१ महाविद्यालयीन स्वयंसेवकांनी प्रदर्शनाच्या व्यवस्थेचे काम पाहिले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कात्रज भाग माननीय संघचालक श्री. शिवाजीराव मालेगावकर, आंबेगाव नगर माननीय संघचालक श्री. गणेश पाठक आणि विज्ञान भारती संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव डॉ. कौस्तुभ साखरे आदी मान्यवरांनी या प्रदर्शनास विशेष भेट दिली.

बाल गोकुलम् कात्रज भाग समन्वयक श्री. सचिन डांगे, भाग सह संयोजक सौ .मेधावी राजवाडे, नगर संयोजक श्री अमित कोल्हार, नगर सह संयोजक सौ. पूनम कुलकर्णी, सर्व बालगोकुलम शिक्षक तसेच लेक विस्टा सोसायटीचे सर्व कमिटी सदस्य आणि विविध शाळांतील शिक्षक यांनी हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

अन्य लेख

संबंधित लेख