Saturday, September 7, 2024

तालिबान सरकारचा नवीन कायदा : महिलांच्या आवाजावर घातली बंदी .

Share

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवलेल्या तालिबानने आता इस्लामिक विचारसरणीचे. कठोर नवीन कायदे आणले आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने मंजूर केलेल्या या नव्या कायद्यांतर्गत, महिलांना त्यांचे चेहरे दाखवण्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा आवाज ऐकू देण्यास म्हणजे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे , ज्यामुळे महिलांचे हक्क दडपण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतुकीपासून ते वैयक्तिक उत्सवांपर्यंत दैनंदिन जीवनातील विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या 35 कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे

कलम 13 हा कायदा महिलांना लक्ष्य करत त्यांच्या साठी कठोर ड्रेस कोड आणि सार्वजनिक वर्तनाची अंमलबजावणी करणे, अनिवार्यपणे सार्वजनिक ठिकाणी महिलांची सहभाग आणि अभिव्यक्ती स्वतंत्र हिरावून घेतो.त्याच बरोबर कलम 19 संगीत वाजवण्यास मनाई करते, एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या वाहतुकीवर निर्बंध घालते आणि सार्वजनिक ठिकाणी असंबंधित स्त्री-पुरुषांच्या मिसळण्यावर बंदी घालते.

हे नियम तालिबानच्या शासन पद्धतीचा एक भाग म्हणून आले आहेत ज्याचे. ते वर्णन करतात कि दुर्गुणांचा सामना करण्यासाठी आणि सद्गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे नवीन कायदे केले आहेत

आंतरराष्ट्रीय स्तरावर या कायद्यांचे भयावह आणि निषेधाने प्रतिक्रिया समोर येत आहे .अफगाण महिलांच्या स्वातंत्र्यावरील होणाऱ्या गंभीर परिणामांवर संयुक्त राष्ट्रांनी म चिंता व्यक्त केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख