प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच
तिरुपती इथल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची गंभीर बाब आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रसादामध्ये प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, ही केवळ भेसळ नसून हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला धार्मिक आघात आहे. हा प्रकार म्हणजे हिंदूंशी केलेला विश्वासघातच आहे. या मंदिरातील पवित्र लाडू बनवण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती आस्थापनाला देण्यात आले होते, मंदिराच्या विश्वस्तपदी ख्रिस्ती व्यक्तींना नेमले गेले होते, मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराला प्रोत्साहन दिले गेले. या प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले गेले, असे प्रतिपादन मंदिर महासंघाकडून करण्यात आले आहे.
धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणीही
करण्यात आली आहे. याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने मुंबईत आंदोलन करण्यात आले.
प्रसादाच्या लाडूच्या प्रकरणाचीच नव्हे, तर जगनमोहन रेड्डी सरकार आणि त्यांचे वडील सॅम्युअल
राजशेखर रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपति मंदिराशी निगडीत घेतलेल्या सर्वच निर्णयांची सखोल
चौकशी करण्यात यावी. त्यातील जे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले असतील, ते सर्व तात्काळ रद्द
करण्यात यावेत, अशी मागणी ‘मंदिर महासंघा’ने आंध प्रदेश सरकारकडे केली आहे.
हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे रक्षण करणे, हे सरकारचे दायित्व आहे. मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद
हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही
धर्मपरायण हिंदु असावा, अशी मागणी करण्याची वेळ आज आली आहे. यासाठी हिंदु समाजाने उठाव
करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी, असे मंदिर महासंघाने म्हटले आहे.
द घोस्ट ऑफ 1980: द बीफ टॅलो स्कँडलची पुनरावृत्ती
तिरुपती लाडू वादाने 1980 च्या दशकाच्या सुरुवातीच्या कुप्रसिद्ध गोमांस गोमांस घोटाळ्याच्या आठवणी परत आणल्या आहेत, ज्याने देशालाही हादरवून सोडले होते. त्या कालावधीत, गोमांस टॅलो – गायीपासून मिळणारे प्राणी चरबीचा एक प्रकार – आयात केला जात होता आणि भारतीय घरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या भाजीपाला-आधारित स्वयंपाक तेल, वनस्पतिमध्ये मिसळले जात असल्याचे अहवाल समोर आले. या घोटाळ्यामुळे विशेषत: गायीला पवित्र मानल्या जाणाऱ्या हिंदू समाजात संतापाची लाट उसळली. पंजाब आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये निदर्शने सुरू झाली आणि हा मुद्दा त्वरीत मोठ्या राजकीय वादात सापडला.