Tuesday, September 17, 2024

‘दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा; उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाडांचा जोरदार प्रहार

Share

मुंबई : पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच घोषित करण्याची मागणी केली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या मुद्द्याला पद्धतशीरपणे बगल दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर मोठी नाचक्की ओढवली. या मुद्द्यावरून आता प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

प्रसाद लाड म्हणाले की, “कालच्या सभेतील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं थोडक्यात विश्लेषण करायचं झाल्यास, पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा, अशी त्यांची अवस्था झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठीच्या लाचारीची परिसिमा उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांमुळे संपवली आहे.” असा टोला प्रसाद लाड यांनी लगावला.
 
पुढे ते म्हणाले, “ज्या मातोश्रीला शिवसैनिक दैवत मानतात, जिथे शिवसैनिक नतमस्तक व्हायचे, त्याच मातोश्रीवर राहणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि राहूल गांधींच्या पाया पडावं लागत आहे. तसेच मला मुख्यमंत्री करा, असं त्यांना सारखं सारखं म्हणावं लागतंय, त्यामुळे वर जे मी म्हटलं की, पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा, अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था झालेली आहे,” असा टोलाही प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख