Tuesday, September 17, 2024

विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आसलेल्या छावा चित्रपटाचे टीझर रिलीझ

Share

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांची भूमिका असलेलया छावा चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. टिझर चा पहिला सीन हा प्रखर युद्धाच्या दृश्यांसह सुरु होतो. ज्यात विक्की कौशल हा महान छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी पुत्र संभाजी महाराज्यांचा भूमिकेत आहे.

तो एका शूर सैनिकाप्रमाणे लढताना दिसतो. छोट्या क्लिपमध्ये विक्की कौशल ने त्याच्या लूक आणि ॲक्शनने सर्वांना प्रभावित केले आहे. टीझर रिलीजपूर्वी विकीने चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये तो प्रभावी दिसत आहे आणि तो शेकडो सैनिकांशी लढताना दिसत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख