Friday, January 3, 2025

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना.

Share

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राताल गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी ,शेतकरी समावश असताो. परंतु कालारूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्वाचे ठरले आहे याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या साठी शासना कडुन 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी हे या मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या महामंडळाचे केंद्र हे पंढरपूरला असणार आहे.

तसेच राज्य सरकारने प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचाही मान्य करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत निळोबारायांच्या पालखीचे दर्शन घेतलं. खेड पाटी येथे वारकरी वेशात उपस्थित राहून टाळ वाजवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीत सहभागी झाले तसेच पंढरपूरला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांची भेट घेतली.

अन्य लेख

संबंधित लेख