Saturday, December 20, 2025

राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल

Share

मुंबई : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 रिक्त सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणांची मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

उर्वरित नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, सर्व संबंधित ठिकाणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख