Wednesday, January 14, 2026

मतदार ओळखपत्र नाही? टेन्शन सोडा! ‘या’ कागदपत्रांच्या आधारे करा मतदान

Share

मुंबई : महाराष्ट्रातील २९ पैकी २८ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आपल्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नाही किंवा ते हरवले आहे, या चिंतेत अनेक नागरिक असतात. मात्र, निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी मोठी सवलत दिली आहे. तुमचे नाव मतदार यादीत असेल, तर तुम्ही ओळखपत्राशिवायही आपला मतदानाचा हक्क बजावू शकता.

यादीत नाव असणे अनिवार्य
मतदान करण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र’ (EPIC) असणे बंधनकारक नाही. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अधिकृत मतदार यादीत तुमचे नाव असणे. जर तुमचे नाव यादीत समाविष्ट असेल, तर तुम्ही मतदान केंद्रावर ‘व्होटर स्लिप’ आणि त्यासोबत खालीलपैकी कोणतेही एक अधिकृत ओळखपत्र दाखवून मतदान करू शकता.

‘हे’ पुरावे ग्राह्य धरले जाणार
जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर तुम्ही खालीलपैकी कोणताही एक फोटो असलेला पुरावा दाखवू शकता:

१. आधार कार्ड
२. पॅन कार्ड (PAN Card)
३. पासपोर्ट
४. ड्रायव्हिंग लायसन्स
५. मनरेगा जॉब कार्ड
६. फोटो असलेले पेन्शन कार्ड
७. केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी ओळखपत्र
८. बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटोसह पासबुक
९. कामगार मंत्रालयाने जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

महत्त्वाचे म्हणजे, केवळ ‘व्होटर स्लिप’ दाखवून मतदान करता येणार नाही. ओळख पटवण्यासाठी वरीलपैकी एक फोटो असलेले मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

तुमचे नाव मतदार यादीत असे तपासा:
लोकशाहीच्या या उत्सवात तुमचा सहभाग निश्चित करण्यासाठी तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे आजच तपासा:

संकेतस्थळ: निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या.

ॲप: ‘Voter Helpline’ मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

हेल्पलाईन: मतदार केंद्रावर जाऊनही तुम्ही यादीतील नावाचा शोध घेऊ शकता.

अन्य लेख

संबंधित लेख