Friday, January 16, 2026

छोटा भाऊ ते ‘किंगमेकर’! मुंबईत भाजपची ‘शंभरी’ पार; पहिल्यांदाच भाजपचा ‘मराठी महापौर’ बसणार?

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालांचे चित्र स्पष्ट होत असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. “मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा मराठी महापौर विराजमान होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही,” असे ठाम प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले असून, यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजपच्या ४० वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण
मुंबईत भाजपच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना उपाध्ये म्हणाले की, “गेल्या ४० वर्षांपासून भाजप कार्यकर्त्यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आता पूर्ण होताना दिसत आहे. आमची सुरुवात एक ‘छोटा भाऊ’ म्हणून झाली होती, पण आज भाजप स्वबळावर १०० जागांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे फळ आहे.”

‘मराठी महापौर’ यावरच शिक्कामोर्तब
मुंबईच्या महापौराबाबत विचारले असता उपाध्ये यांनी स्पष्ट केले की, मुंबईत भाजपचाच महापौर होईल आणि तो ‘मराठीच’ असेल. यामुळे भाजपने आपल्या संभाव्य महापौराच्या चेहऱ्याबाबतचे संकेत दिले आहेत. महायुतीमधील घटक पक्षांशी चर्चा होईलच, मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याने शहराचे प्रथम नागरिकपद भाजपकडेच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीत चर्चा होणार, पण…
उपाध्ये यांनी स्पष्ट केले की, जरी महायुतीमध्ये जागावाटप आणि सत्तेबाबत चर्चा होणार असली, तरी मुंबईकरांनी भाजपला दिलेला कौल पाहता महापौर भाजपचाच असेल. “आमच्या आणि मुंबईच्या स्वप्नातील अंत आता संपत आले आहे. भाजप १०० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून लवकरच हे स्वप्न सत्यात उतरेल,” असेही त्यांनी नमूद केले.

अन्य लेख

संबंधित लेख