Saturday, November 23, 2024

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले?

Share

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना काय मिळाले ? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. महायुती सरकारने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे.

केशव उपाध्ये यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत सवाल केला आहे कि, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, शरद पवारांसारखे अनुभवी राजकारणी पाठीशी असताना महाविकास आघाडीचे सरकार असताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना काय मिळाले ? अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या, अनेकांची उपासमार झाली होती, कित्येक लोकांचे येण्याजाण्याचे हाल झाले होते.”

“आज महायुती सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पाच हजारांच्या मागणी पेक्षा जास्त म्हणजे साडेसहा हजार रुपयांची वेतनवाढ दिली आहे. शिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी सर्वांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजने प्रमाणे संलग्न योजना करण्याचे आदेश दिले आहेत.”

अन्य लेख

संबंधित लेख