Tuesday, December 3, 2024

व्हायरल व्हिडिओ: मुस्लिम व्यक्तीचा संभाजीनगर संबोधण्यास नकार.

Share

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर फिरत असलेल्या एका व्हिडिओने संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद असा वाद उफाळून आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती औरंगाबाद शहराचा उल्लेख छत्रपती संभाजीनगर या नवीन नावाने करण्यास नकार देऊन औरंगाबादच म्हणण्याचा आग्रह धरताना दिसतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ औरंगाबाद शहराचे व जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करून गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केली. मात्र मुस्लिम समाजाकडून मात्र या नामांतराला विरोध दर्शविण्यात आला होता.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण एका मुस्लिम दुचाकीस्वाराकडे लिफ़्ट मागतो. बाईकवर बसल्यानंतर तो तरुण व्हिडीओ मध्ये आपण संभाजीनगरला जात असल्याचा उल्लेख करतो. तेंव्हा बाईक चालविणारा मुस्लिम व्यक्ती त्याला तात्काळ रोखत “हे औरंगाबाद आहे, संभाजीनगर नाही” असे उत्तर देतो.

क्रूर मुघल बादशाह औरंगजेबाच्या नावावर असलेले औरंगाबाद शहर हे हिंदूंवरील दडपशाही व जुलुमाचे चे प्रतीक म्हणून पहिले गेले. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे या शहराचे नाव क्रूरकर्मा औरंग्याच्या अत्याचारापुढे न झुकता आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांवर असावे अशी मागणी सामान्य जनतेची होती. मात्र काँग्रेसच्या मुस्लिम अनुनय धोरणामुळे ही मागणी फेटाळली गेली होती. या व्हिडीओमुळे मुस्लिम समाजातील काही व्यक्तींना औरंगजेब अजूनही प्रिय असल्याचे सत्य बाहेर आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख