Thursday, January 2, 2025

राज्यातील योजना कायम राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Share

राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याने लाडकी बहीणसह(Ladki Bahin Yojana) कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिली. पिंपरी-चिंचवड शहरातल्या विकासकामांचे भूमीपूजन,  उद्घाटन आणि लोकार्पण त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचं सांगून  देशात सर्वात जास्त वस्तू आणि सेवा कर महाराष्ट्रातून मिळतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri Chinchwad) अंतर्गत पिंपळे गुरव येथे विविध विकास कामांचं ई-भूमिपूजन, उद्धाटन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. विकासाच्या वाटेवर वेगानं पुढे जात असताना पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकार नवनवीन प्रकल्प आणि योजना राबवत असल्याची माहिती दिली. सर्व समाज घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.

अन्य लेख

संबंधित लेख