Thursday, November 21, 2024

आरएसएस संचलनावेळच्या अनुचित प्रकाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

Share

रत्नागिरी नजिक कोकणनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांचे संचलन करण्यात आले. या प्रसंगी काही तरुणांनी एका माजी नगरसेवकाच्या सूचनेवरून प्रक्षोभक घोषणा दिल्या, असा आरोप सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि धार्मिक तेढ वाढवल्याबद्दल कारवाई केली पाहिजे, या मागणीसाठी संघटनेचे कार्यकर्ते शहर पोलीस स्थानकात गोळा झाले

गेल्या शुक्रवारी (११ ऑक्टोबर) शहरातील कोकणनगर येथे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन घेण्यात आले होते. या संचलनाच्या वेळी काही अनुचित प्रकार तेथे घडला. त्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगाच्या वेळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, या मागणीसाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश ऊर्फ बाबू माप, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, विभाग प्रमुख प्रकाश रसाळ, तारक मयेकर, नितीन लिमये आदी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख