Thursday, November 21, 2024

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाकडे महायुतीची यशस्वी वाटचाल…

Share

महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकार प्रयत्नशील राहिले आहे. गेल्या वर्षी, अर्थसंकल्प २०२४ मध्ये, महिला गुंतवणूकदार आणि मुलींसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली. २०१५ मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून ‘सुकन्या समृद्धी’ ही योजना विशेषत: मुलींसाठी सुरू करण्यात आली होती. नुकतीच ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाली असून सुभद्रा योजना लवकरच सुरू होणार आहे.

‘माझी लाडकी बहीण योजना’

‘माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रातील महिलांसाठी जुलैमध्ये सुरू करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची सुरुवात झाली आहे.

या योजनेला पात्र कोण असणार?

सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेता येणार आहे.

२१ ते ६५ वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.

इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल.

सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही.

अन्य लेख

संबंधित लेख