नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचे जे पी नड्डा यांनी मुंबईत आज सांगितले.
राष्ट्रसेवा करण्यासाठी संतांचा आशीर्वाद हवा. नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. मुंबईत आज त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांशी संवाद साधला. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज विलेपार्ले येथे सन्यास आश्रम च्या वतीने “संत शक्ती के साथ संवाद” कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परमपूज्य आचार्य महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वर आनंद गिरी जी महाराज, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, भुवेंद्र यादव, आशिष शेलार, आदी मान्यवरांसह थोर संत,महंत उपस्थित होते.