Saturday, October 19, 2024

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम असून विविध मतदार संघातील जागांबाबत अद्याप एकमत झाल्याचे चित्र नाही.

नाना पटोले व संजय राऊत यांच्यात विसंवाद वाढल्याने आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीकर नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत मविआतील वाद थेट पत्रकार परिषदेतून मांडल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यावर, देसाई यांनी ते तसं नाही, म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसचं राज्यातील नेतृत्व सक्षम नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे, असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला होता. त्यावर, संजय राऊत उद्धव ठाकरेंचं म्हणणं ओलांडत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे उत्तर नाना पटोले यांनी दिलं. त्यानंतर, अनिल देसाई आणि जितेंद्र आव्हाडांकडून पटोलेंना शांत करण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निडणुकांचे अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख